अकोल्यात बकरी ईदपूर्वी विशेष बैठक…

अकोल्यात बकरी ईदपूर्वी विशेष बैठक...

अकोल्यात बकरी ईद निमित्ताने म न पा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने

यांनी त्यांच्या दालनात म न पा क्षेत्रामध्ये बकरी ईद निमित्त होणारी जनावरांची कुर्बानी

व त्या मध्यमातून निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावणे, नियमांचे पालन करावं

Related News

या विषयावर मुस्लिम धर्मियांमधील लोक प्रतिनिधी व मुस्लिम समाजातील प्रतिनिधी सोबत

विशेष बैठक संपन्न झाली. या दरम्यान, बैठकीत पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था करणे, स्वच्छतेची व्यवस्था,

कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्था, स्वच्छतेसाठी लागणारे कर्मचारी आदि चर्चा केली.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. लहाने यांनी, बकरी ईद निमित्त होणारी कुर्बानी ही तीन दिवस चालणार

असून या काळात पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी वाहनांची आणि कर्मचा-यांची व्यवस्था करणे,

मुस्लिम बहुल भागात तसेच ईदगाह आणि मस्जिद परिसरातील नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येवू नये.

याचसोबत या तीन दिवसांमध्ये या व्यवस्थे अंतर्गत येणा-या कर्मचा-यांना सुटी देण्यात येऊ नये.

आदि सुचना संबंधीत विभाग प्रमुखांना मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी दिल्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/mofat-maharogya-shibir/

Related News