अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी

अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; "बांगलादेशी" ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी

भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात “बांगलादेशी” असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,

ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे लोक म्हणतात की ते महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत.

जर ते खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रात राहण्याची परवानगी कशी मिळाली?

Related News

आणि जर नसेल तर त्यांना बांगलादेशात का पाठवण्यात आले नाही?

चर्चे दरम्यान सरकारकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली.

जर हे सर्व २८०० लोक, जे स्वतःला महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दावा करत आहेत,

ते खरोखरच येथील आहेत आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने रद्द केले गेले असेल,

तर जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जर ते खरोखरच परदेशी नागरिक असतील,

तर त्यांना नियमांनुसार परत पाठवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी चर्चा आज विधिमंडळात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/bhartacha-lordswar-darun-parabhav-jaiswal-nairachaya-flop-kamagirivar-chahthanancha-sum/

Related News