अकोलात उषाताई घुगे स्मृती काव्यस्पर्धा आणि कवी संमेलन

उषाताई घुगे

 साहित्यातून समाजप्रबोधनाचा संदेश

अकोला – समाजप्रबोधनाचे महत्त्व साहित्यातून व्यक्त करता येते, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी अकोला आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी  सुरज गोळे यांनी केले. अंकुर साहित्य संघ व उषाताई घुगे बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि .१४ )कौलखेड येथील गणेश गार्डन सभागृहात स्व.उषाताई घुगे स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहपूर्ण कार्यक्रमात साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी गजानन छबीले यांनी केले तर प्रास्ताविक श्री तुळशीरामजी बोबडे यांनी केले. प्रमुख अतिथी  सुरज गोळे यांनी साहित्यातून सामाजिक संदेश देण्याचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जेष्ठ साहित्यिक वासुदेवराव खोपडे, माजी नगरसेवक गजानन गवई, नगरसेवीका योगीता पावसाळे, समीक्षक डॉ विनय दांदळे आदी मान्यवर मंचस्थ होते.काव्यस्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण दिडशे कविता प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये ब्रम्हपुरी (चंद्रपूर) येथील रोशन पीलवान प्रथम पुरस्काराचे विजेता ठरले. द्वितीय क्रमांकावर नाशिक येथील सौ अलका कोठवडे तर तृतीय क्रमांक  सारिका अयाचित यांनी मिळवला. तसेच, उत्तेजनार्थ पुरस्कारांत राहुल भगत,  प्रिया भोंडे, प्रकाश डोबाळे,  कृष्णराव घाडगे व सुमेध वानखडे यांचा समावेश होता. विजेत्या कवींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी बहारदार कवी संमेलन सुद्धा पार पडले. अध्यक्षस्थानी डॉ अशोक सिरसाठ तर प्रमुख पाहुणे  विठोबा गवई, कवी पत्रकार देवानंद गहीले, उमा गंवई,  सुरज गोळे,  हिम्मत ढाळे,  सारिका अयाचित, राहूल भगत,  संजय कावरे, नारायण अंधारे, नयनाताई देशमुख, प्रा मोहन काळे, गोदावरी कलोरे, तारा अस्वारे, विनय दांदळे, ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेश थोरात, सुनील लव्हाळे, भारत ईंगोले, अमोल गोंडचवर, सुमेध वानखेड़े व वासुदेवराव खोपडे मंचस्थ होते. त्यांनी आपापल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ मनोहर घुगे यांनी केले. या कार्यक्रमातून साहित्याच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याचा व सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

read also : https://ajinkyabharat.com/obc-reservation-2/