अकोला : अकोल्यातील शिवणी परिसरात काल रात्री सुप्रसिद्ध फर्निचर
व्यापारी सुफियान सेठ यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी
त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले
असता उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सुफियान सेठ यांनी अल्पावधीत व्यवसायात मोठी प्रगती केली होती.
मात्र हत्या कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
हल्लेखोर फरार असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
व्यापाऱ्याच्या हत्येमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपींचा शोध तातडीने घ्यावा, अशी व्यापारी वर्गाची मागणी होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/karajanya-51-mandanchi-ganesh-establish/