अकोला येथील मास्टर पावर जलतरण तलाव येथील दिव्यांग जलतरणपटूंने राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले.

अकोला येथील मास्टर पावर जलतरण तलाव येथील दिव्यांग जलतरणपटूंने राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले.

दि.21 ते 23 मार्च 2025 या कालावधीत दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन द्वारा रेशीम बाग मैदान नागपूर येथे आयोजित

दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जलतरण या प्रकारात मुलांनी दोन सुवर्ण,

एक रौप्य व एक कास्य असे पदके पटकावले यामध्ये स्वर्गीय कन्नूभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला

Related News

चे विद्यार्थी कु. सृष्टी सावळे 17 ते 21 या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक,

कु. ज्ञानेश्वरी इंगळे 13 ते 16 या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, 17 ते 21 या वयोगटात शिवम सरदार 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक तसेच कुणाल तेलगोटे यांनी 50 मीटर पोहणेमधे कास्य पदक पटकावले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व स्वातंत्र्य अशी विशेष बॅच घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट सर यांचे मार्गदर्शक मिळाले

व मास्टर पॉवर स्विमिंग क्लब चे संचालक योगेश अनंत पाटील(NIS. Coach)यांच्या मार्गदर्शनात स्विमिंग क्लबचे प्रशिक्षक दीपक सदांशिव, प्रमोद खंडारे,सुशील कांबळे, मोहील खरात, संदीप मेहेरे (क्रीडा तज्ञ),

अभिषेक ताले,सतीश पाणझाडे, ज्योती पंपालिया, दिनेश वाघ, संतोष जगताप, चंचल महाजन, तुषार शेगोकार, विकी पवार, विनय तायडे, मनीषा वंजारी,कविता जावरकर इत्यादींच्या सहकार्याला

यश मिळाले या सर्व मास्टर पावर स्विमिंग क्लबच्या प्रशिक्षक व लाईफ गार्डचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे सत्कार करण्यात आले

अकोला जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर चमकवण्याचे काम या क्लब कडून होत असून सर्व सदस्य व जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.

Related News