अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल

अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल

अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात

जाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे तपास सुरू आहे.

Related News

गजानन प्रल्हादराव हरसुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या शेतात ३ जुलै रोजी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.

दरम्यान तणनाशकाच्या फवारणीमुळे शेतातील उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून,

फिर्यादीने अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

यासंदर्भात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/daruwari-karvadhivat-akolidat-vain-bar-bandi-bandi-bandicha-bandicha-gesture/

 

Related News