अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला: आगामी रमजान ईद, श्रीराम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.

याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला.

शहरातील सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Related News

शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तैनात होते. पोलिसांचा हा रूटमार्च नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Related News