अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा

अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा

महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

अकोला (15 एप्रिल 2025)

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

त्यामुळे महानगरपालिकेने आजपासून (१५ एप्रिल) शहरात दर पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related News

याआधी दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता.

सध्या प्रकल्पात २२.८३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून, ही आकडेवारी गेल्या

वर्षीपेक्षा थोडी जास्त (०.५४%) असली तरी, उन्हाळ्याचे वाढते तापमान

लक्षात घेता आगामी काळात जलसाठा लवकरच आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गतवर्षी १५ एप्रिल रोजी २६.४५% जलसाठा होता, तर यंदा तो २६.९९% आहे.

मात्र पाण्याची मागणी वाढत असल्याने नगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.”

नागरिकांनी पुढील सूचना आणि वेळापत्रकासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे,

तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-satpir-darga-hatavinyavarun-violence/

Related News