अकोला सत्र न्यायालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

अकोला सत्र न्यायालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्हा सत्र न्यायालय परिसरात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मानसिक

छळ व विनयभंग केल्याप्रकरणी वकील सौरभ तेलगोटे याला पुन्हा दोन

दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे.

ही घटना १७ जुलै रोजी घडली होती. महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,

सत्र न्यायालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असताना तेलगोटे यांनी त्यांचा मानसिक छळ केला व विनयभंग केला.

या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करताच सौरभ तेलगोटे

याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर,

न्यायालय परिसरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत,

या दृष्टीने पोलिसांनी पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली आहे.

या प्रकरणामुळे न्यायालयीन परिसरातील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून,

महिला अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, वकिलांमध्येही या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून,

यासंदर्भात वकिल संघटनांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/parbhanit-st-bus-duchaki-daghancha-jagitu-died/