आज, ४ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील प्रतिबंधक पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कार्यवाही केली.
कागजीपुरा मजीद जवळी गल्लीतील कार्यवाही दरम्यान, तनवीर अहमद शेख आमद (वय २४ वर्ष, रा. खडकरपुरा, जुनी वस्ती, मुर्तिजापुर, अकोला) याला अटक केली.
त्याच्या ताब्यातून १० गोवंश जातीचे जनावरे, एक महिंद्रा कंपनीची जिनीओ पांढरी रंगाची गाडी (क्रमांक एमएच २७ एक्स ६३७६) आणि इतर मुददेमाल जप्त करण्यात आले.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
संपूर्ण मुददेमालाची किंमत एकूण ७,७६,००० रुपये आहे, ज्यामध्ये १० गोवंश जातीचे जनावरे १,७६,००० रुपये आणि गाडीची किंमत ६,००,००० रुपये आहे.
जप्त केलेली गाडी आणि जनावरे आदर्श गोसेवा संस्था, म्हैसपुर, अकोला यांना पुढील संगोपन व देखरेख करण्यासाठी ताब्यात देण्यात आली.
या कार्यवाहीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिष कुलकर्णी, आणि
पोलीस निरीक्षक श्री. मनोज बहुरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यवाहीमध्ये पो. दादाराव टापरे, पो. शेख हसन शेख अब्दुल्ला, पो.कॉ. श्याम मोहळे, रोशन पटले,
आणि शिवाजी धोत्रे यांचा सहभाग होता.
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला ने या कार्यवाहीच्या माध्यमातून कत्तलीसाठी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक रोखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/womens-fair-organized-on-the-occasion-of-akola-police-foundation-day/