अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरीप्रकरणी चोर 2 तासात जेरबंद

अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरीप्रकरणी चोर 2 तासात जेरबंद

अकोला: अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याला

रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत अटक केली आहे.

🔹 घटनाक्रम: कानपूरहून आलेला आणि हैदराबादला जाणारा प्रवासी अकोला

Related News

रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना झोपून गेला.

त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाची बॅग लंपास केली,

ज्यामध्ये दीड लाखांचा लॅपटॉप होता.

🔹 जलद कारवाई: तक्रार मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने CCTV फूटेज तपासले

आणि स्टेशन परिसरात शोधमोहीम राबवून काही तासांतच

प्रवाशाची बॅग आणि लॅपटॉपसह चोराला अटक केली.

🔹 पोलिसांचे नागरिकांना आवाहन:

रेल्वे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन

पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद व्यक्ती

आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

Related News