अकोला : गत दोन दिवसांपूर्वी गणेश विसर्जन करून परत येत असतांना कापशीनजीक झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच आज अकोला पातूर रोडवर कंटेनर पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पातूर – अकोला रोडवरील चिखलगाव जवळ पातूरकडून अकोल्याकडे जात असलेला एक कंटेनर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक पलटी होऊन अपघात झाला असून या अपघातात ट्रक चालक साजिद खान रा.अलवर, राजस्थान याचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्राथमिक पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदना करीता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पातूर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/maratha-kunbi-obc-reservation-motha-suit/