कठोर कारवाई करण्याची मागणी

कठोर

अकोला– दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयस्क गरीब कुटुंबातील मुलीवर अत्यंत गंभीर बलात्कार व छेडछाड प्रकरण समोर आले. या जघन्य कृत्याच्या विरोधार्थ अकोला मुस्लिम समाजाने आज (दि.११) अकोला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यालयात जाऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.या वेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मुफ्ती अशफाक कासमी, जमात-ए-इस्लामी हिंदचे वरिष्ठ सदस्य वज़ीर जनाब, मरकज़ी अहले सुन्नतचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, कच्छी मस्जिदचे अध्यक्ष जावेद झकरिया, जमाते इस्लामीचे शहर अध्यक्ष डॉ. अहमद उरूज, इरफान खान जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, सैयद नदीम आणि शाहिद खान उपस्थित होते.समाज प्रतिनिधींनी या अमानवीय घटनेची तीव्र निंदा करत म्हटले की –“गुन्हा करणारा कोणत्याही समाजाचा असो, त्याला सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी. असे शैतानी कृत्य करणारे कोणत्याही समाजाचे नाहीत. इस्लाम धर्मदेखील अशा पापी कृत्यांचे तीव्र विरोध करतो. आमचा समाज पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबासोबत ठामपणे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी अखंड प्रयत्न करेल.”समाज प्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली की पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा.दोषींवर कायद्याने सर्वात कठोर शिक्षा केली जावी.आरोपीच्या मालमत्तेवर निर्बंध लावले जावे, जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता यावी.अकोला मुस्लिम समाजाने स्पष्ट सांगितले की, अशा अमानवीय कृत्यांवर कोणतीही सवलत नसावी. समाजाने कटिबद्धतेने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास तयार आहे, असा इशाराही समाजाने दिला आहे.या घटनेने संपूर्ण समाजात मोठा धक्का दिला असून सध्या प्रशासनाच्या पुढील पावलांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/samorchaya-mahilechaya-vigilance/#google_vignette