अकोला: मलकापूर चौकात एकाच रात्री तीन ते चार दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अकोला: मलकापूर चौकात एकाच रात्री तीन ते चार दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अकोला खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर चौकाजवळील तीन ते चार

दुकानांमध्ये चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुर्तीजापुर येथे काल

एकाच दिवशी दोन घरात चोरीची घटना होत नाही तोच आज 26 फेब्रुवारी च्या रात्री एकाच

Related News

वेळी तीन ते चार दुकान फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत

चालल्या असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मलकापूर परिसरातील

तीन ते चार दुकानातून चोरी होऊन लाखो रुपयाचे साहीत्य व रोकड लंपास केल्याचे

सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी खदान पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read more news here : https://ajinkyabharat.com/mahashivratri-special-akolechaya-shri-rajarajeshwar-mandir-bhavikanchi-muthi-gardi-pahetepasoon-abhishek-and-darshan-suru/

Related News