अकोला महापालिकेतील लिपिक रवी अवथनकर 300 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

अकोला महापालिकेतील लिपिक 300 रुपयांच्या लाचेसह रंगेहात!

अकोला : शहराच्या महानगरपालिकेत आज पुन्हा एकदा लाचखोरीचा पर्दाफाश झाला आहे.

जन्ममृत्यू नोंदणी विभागातील लिपिक

रवी अवथनकर याला केवळ 300 रुपयांची लाच

स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

जन्म प्रमाणपत्रासाठी अवथनकर याने तक्रारदाराकडे लाच मागितली होती

. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली.

उपअधीक्षक मिलिंदकुमार बाहकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने

आज सकाळी महापालिकेवर धाड टाकत ही कारवाई पंचासमक्ष केली.

यापूर्वीही महापालिकेतील अधिकाऱ्यांवर विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली होती.

परंतु आज प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या कार्यालयातच लाच घेताना

कर्मचारी पकडला गेल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/amravati-vidyapithachaya-dharmat-vidyarthi-professor-aani-samajitala-gatti/