अकोला ते हातरुण हा मुख्य रस्ता आता जीवघेणा ठरत आहे..
दहा ते पंधरा गावांना जोडणारा या रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून पावसात रस्त्यावरील खड्डे
चुकवताना मोठ्या प्रमाणावर अपघात देखील कळत आहेत.
यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोला ते हातरुण मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
या मार्गाने दररोज शेकडो नागरिक प्रवास करत असून रस्त्याची दुरावस्था लक्षवेधी ठरत आहे.
या रस्त्याने जोडले गेलेले 15 गावातील ग्रामस्थांनी यापूर्वी शासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती.
मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांनी तिथे लक्ष दिलेलं नाही.. पावसाळा सुरू होताच या रस्त्यावर पाणी साचते आणि संपूर्ण रस्ता नदीसारखा वाहू लागतो.
रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने बरेच अपघात होतात अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत जाणे,
मजुरांना कामावर पोहोचणे आणि रुग्णांना दवाखान्यात नेणे अवघड झाले आहे.
तर रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून अनेक जण जखमी झाले आहेत.
हा रस्ता प्रमुख असल्याने दहा ते पंधरा गावांचा संपर्क यावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे आवाज उठवला
असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे .
अन्यथा त्याचा तीव्र निषेध करण्यात येईल असा इशाराही दिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/grampanchayat-office-vasamoril-trespassing-g-pt/
