अकोला: हमजा प्लॉट येथे मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पाणीपुरवठा विस्कळीत

अकोला: हमजा प्लॉट येथे मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पाणीपुरवठा विस्कळीत

अकोला शहरातील हमजा प्लॉट, हरिहर पेठ येथे ५०० मिमी व्यासाची मुख्य

जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने गंगा नगर, जोगळेकर प्लॉट आणि

लोकमान्य नगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Related News

घटनाक्रम:

चांदखा प्लॉट चौकातील मारिया मेडिकलसमोर बुधवारी संध्याकाळी नाल्याचे

काम सुरू असताना जलवाहिनी फुटली. परिणामी, हजारो लिटर पाणी वाया गेले.

प्रशासन एकीकडे पाणी बचतीचे आवाहन करत असताना,

वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचे आवाहन:

म .न .पा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की,

जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि पूर्ण झाल्यानंतरच नियमित पाणीपुरवठा सुरळीत होईल.

नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/how-many-years-junan-mandir/

Related News