अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव

अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव

अकोला,

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद प्रशासनाकडे आहे.

Related News

शेतीसाठी अत्यावश्यक असलेलं सिंचन, योग्य बाजारभाव, वेळेवर मिळणारा पीकविमा,

तसेच बँकांकडून सहकार्य न मिळणं या सर्व बाबी आजही ग्रामीण भागात दिवास्वप्न ठरत आहेत.

परिणामी, अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी नैराश्यात जात असून, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.

गेल्या २५ वर्षांत अकोला जिल्ह्यात ३१९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

ही बाब केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही चिंतेचा विषय बनली आहे.

शासनाच्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने आणि शेतकऱ्यांचे

प्रश्न केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने, ही परिस्थिती दिवसेंदिवस बळावत आहे.

तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाची सोय,

किमान हमीभाव, कर्जमाफी, वेळेवर विमा भरपाई आणि प्रभावी मनोबल वाढवणारे उपाय अत्यावश्यक आहेत.

Read Also :https://ajinkyabharat.com/the-terrorist-of-the-aminh-terrorist-avinash-jadhav-yancha-polysanwar-sorrow/

Related News