अकोला शहरातील रस्त्यांवर बेशिस्त व अराजकतेने धावणाऱ्या ऑटो रिक्षांमुळे
अकोलेकर हैराण झाले असून, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेत अखेर शहर वाहतूक शाखेने
कारवाईचा बडगा उगारला शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष १०४ बेशिस्त ऑटो
रिक्षा जप्त करून त्यांना दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई मध्यवर्ती बसस्थानक परिसर,
धिंग्रा चौक, रेल्वे स्टेशन चौक, गांधी चौक व अन्य मुख्य चौकांमध्ये करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-dhakkadayak-type/