वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. अकोला परिमंडळात एकूण २८० कोटी रूपयांची थकबाकी असून, त्यातील फक्त ८५ कोटी रूपये वसूल झाले आहेत. त्यामुळे वीज थकबाकी शुन्य करण्यासाठी महावितरणने सामुहिक वसूली मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावक यांच्या पुढाकाराने मेहकर विभागातील शेलगावात कारवाई करण्यात आली. यावेळी थकबाकीदार ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढले गेले. या ग्राहकांचा वीज पुरवठा फक्त संपूर्ण थकबाकी, सुरक्षा ठेव व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच जोडला जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.
“मिशन ९० दिवस” अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे चालू बिल आणि जानेवारी पर्यंतची थकबाकी वसूल करणे महावितरणचे उद्दिष्ट आहे. यासाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी प्रत्येक कर्मचारी वसूलीसाठी बाहेर काढण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला वीज बिल वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Related News
महाराष्ट्रातील वीजपुरवठ्याच्या क्षेत्रात एक मोठी आणि निर्णायक घडामोड घडली आहे. देशातील आघाडीचा उद्योग समूह Adani Group यांच्याअंतर्गत येणाऱ्या Adani Power या कंपनीने महाराष्ट्र सरक...
Continue reading
अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका
Continue reading
महावितरणचा थकबाकीदारांवर ‘हाय व्होल्टेज’ शॉक: नागपूर जिल्ह्यात वसुली मोहीम तीव्र
आर्थिक वर्षाच्या अंतिम क्षणांमध्ये, महावितरणने थकबाकीदारांवर कारवा...
Continue reading
SpiceJet Employee Ends Life: WhatsApp Status पाहून घरमालक धावला; गूढ कायम
लखनऊ, गोरखपूर: स्पाईसजेटमध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आपले जीवन संपवले,...
Continue reading
नागपूर, दि. 18 मार्च 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडलात थकीत वीज देयकांच्या वसुलीसाठी प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले असून, वारंवार सूचना देऊनही देयके...
Continue reading
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील नागरिकांसाठी मोठा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातही महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारीत प...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
नागपूर, २४ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्रातील महान समाजसुधारक आणि लोकशिक्षक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणकडून त्यांना ...
Continue reading
Bihar मधील गोपालगंजचा 18 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता, College Student Missing ; आईच्या भावनिक पत्रातून मानसिक त्रास, पोलिस शोध सुरु; संन्...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
Electricity Bill: महावितरण ॲक्शन मोडवर; थकबाकीदारांना कडक इशारा
वीज ही आधुनिक जीवनाची जीवनरेखा मानली जाते. मात्र Electricity Bill वेळेवर न भर...
Continue reading
महावितरणने स्पष्ट केले की, वीज बिल भरले नाही तर पुरवठा थांबवला जाईल. सामुहिक मोहीमेच्या वेळी विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचेही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अकोला परिमंडळातील २८० कोटी रूपयांच्या थकबाकीत घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यांनुसार थकबाकी अशी आहे: अकोला जिल्हा – ११५ कोटी ७४ लाख, बुलडाणा – १४४ कोटी, वाशिम – ५१ कोटी ६५ लाख. यापैकी अनुक्रमे ४० कोटी, ३२ कोटी आणि १३ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत.
महावितरणची ही कारवाई वीज थकबाकी शून्य करण्यासाठी निर्णायक पाऊल असून, ग्राहकांना वेळेत बिल भरण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.
read also : https://ajinkyabharat.com/greetings-from-mahavitaran-to-saint-gadge-maharaj/