अकोल्याच्या अमृता सेनाड यांचा विक्रम – 12 हजार स्क्वेअर फुटांवर गणपतीची भव्य रांगोळी,

अकोल्याच्या अमृता सेनाड यांचा विक्रम – 12 हजार स्क्वेअर फुटांवर गणपतीची भव्य रांगोळी,

अकोला: अकोल्याच्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी तब्बल १२ हजार

स्क्वेअर फुटांवर गणपती बाप्पांची भव्य रांगोळी अवघ्या २३ तासांत साकारत

ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नंद गणपती संग्रहालयाच्या सहकार्याने तयार

Related News

करण्यात आलेल्या या रांगोळीमध्ये अडीच हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.

अकोला-मुर्तीजापूर महामार्गावरील दीप पुरातन वास्तू संग्रहालयाच्या

पटांगणावर अमृता सेनाड यांनी ही कलाकृती साकारली.

विशेष म्हणजे, एकट्या महिलेने रेखाटलेल्या सर्वात मोठ्या

रांगोळीची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे.

याआधीही विक्रमी रांगोळीचा अनुभव

अमृता सेनाड यांनी यापूर्वीही ६ हजार स्क्वेअर फुटांवर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली होती.

गणपती बाप्पांची रांगोळी तयार करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.

मात्र, एकट्या महिलेकडून १२ हजार स्क्वेअर फुटावर

साकारलेल्या या विक्रमी रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related News