अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी

अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी

अकोला जिल्ह्यातील हिरपूर

येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.

गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.

Related News

पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्कारा करता नातेवाईकाची प्रचंड तारांबळ उडाली.

गावातील शेवटचा थांबा स्मशानभूमी सुद्धा दुर्दशेला पोहचलेली आहे.

या गावात पावसाळा आला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते.

डोळ्यावर पाणी, पायाखालून चिखल, आणि चितेसाठी ओलसर लाकडं, मृतदेहाची अखेरची यात्रा अपमानास्पद बनलेली आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरते, त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो,पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून

ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे मात्र आजवर कोणतीच हालचाल नाही.

त्याचबरोबर स्मशानभूमीत एकही व्यवस्थित शेड नाही.

जेव्हा कोणाच्या घरी दुःख कोसळतं, तेव्हा त्यांना आधार हवा असतो.

पण या गावात, मरणाच्या क्षणी सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतंय, ही गोष्ट फक्त दुःखद नाही तर अमानुष आहे.

Read Also :   https://ajinkyabharat.com/balapur-talukyatil-4-grampanchayat-sarpanch-vadhi-sodhat/

Related News