बाळापूर: देगाव ग्रामपंचायत समोर झालेल्या आमरण उपोषणाला
अखेर तोंडी आश्वासनाने शेवट आला.
गेल्या २६ ऑगस्ट रोजी शे दस्तगीर यांनी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले होते.
त्यांच्या मागण्या होत्या की, गावातील गव्हाळे यांनी केलेल्या प्लॉटच्या रस्त्यांमुळे
नेहमी वाद होत असल्यामुळे या समस्येवर प्रशासनाने लक्ष द्यावे.
उपोषणादरम्यान त्यांनी कोणत्याही नायब तहसीलदारांकडून
लेखी आश्वासन न घेतल्यामुळे उपोषण स्थगित केले होते.
यापूर्वी बाळापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी
यांनी उपोषणकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी वेळ मागितला,
परंतु दस्तगीर यांनी नायब तहसीलदार शिवाय उपोषणाचे
मागणपत्र स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे देगावमध्ये उपोर्षणाची पुनरावृत्ती होईल का?
हा विषय चर्चेचा ठरला होता.
२९ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायताला भेट देऊन मोख्या पाहणी केली गेली
आणि सय्यद ऐसानोद्दीन, नायब तहसीलदार बाळापूर यांनी दोन्ही
पक्षांना बोलावून निर्णय देण्याचे ठरविले. या निर्णयामुळे शे दस्तगीर
यांना तात्पुरते समाधान मिळाले असून,
ग्रामस्थांमध्येही शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/cancer-mind-depressed-and-blessed/