अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा

अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा

शिवसेना (उबाठा गट) आणि शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश

अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेचा अखेर शेवट झाला असून,

अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी प्रशासन दरबारी आवाज उठवला होता.

Related News

शिवसेना (उबाठा गट) व शेतकऱ्यांनी या मागणीसाठी एकत्र येत प्रशासनावर दबाव टाकला होता.

 यादी, प्रक्रिया आणि विलंब

अकोलखेड, उमरा, पणज या मंडळांतील पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या कृषी

सहायक आणि तलाठ्यांनी तयार करून शासनाकडे पाठवल्या होत्या.

या याद्यांच्या आधारे KYC प्रक्रिया पूर्ण करून सेतू केंद्रामार्फत अंगठा लावण्यात आला होता.

मात्र, एक महिना उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नव्हते.

 आंदोलनाचा इशारा आणि प्रशासनाची तात्काळ दखल

शेतकऱ्यांनी अकोट तहसीलदारांना निवेदन देत 15 दिवसांची मुदत दिली होती.

अनुदान जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उबाठा गट) तर्फे देण्यात आला होता.

यानंतर शासनाने तात्काळ दखल घेतली आणि अखेर संत्रा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

प्रतिक्रिया:

शिवसेनेच्या वतीने अकोट तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते.

पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

आता शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.

– सुभाष सुरतने, तालुका अध्यक्ष, शिवसेना (उबाठा गट)

गेल्या महिन्याभरापासून आमच्या खात्यात संत्रा अनुदानाची रक्कम जमा होत नव्हती.

आम्ही निवेदन दिलं आणि ‘अजिंक्य भारत’मध्ये बातमी आली. त्यानंतर ही रक्कम मिळाली.

– सुधीर भील, शेतकरी, रामापूर

Related News