अखेर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना अकोला विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सुरु झाले आजपासून आमरण उपोषण

अकोला विभागातील

अकोला-१८ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सादर केलेल्या उपोषण नोटीसवर विभाग नियंत्रक,अकोला यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

करण्यात आली होती व चर्चेअंती उभयपक्षी मान्य केल्याप्रमाणे दिनांक:-२३ ऑगस्ट २०२५ पर्यंत अकोला विभागातील प्रथम टप्पा खातेमार्फत बढती परीक्षा

पास वाहकांना वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नतीचे आदेश देण्यात येईल व इतर पदोन्नतीची कारवाई टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात

आले होते.परंतु २३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासनाने संघटनेला दिलेला शब्द पाळलेला नाही.त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ने आज सोमवार

दिनांक:-२५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11 वाजतापासुन विभागीय कार्यालय अकोला समोर आमरण उपोषण सुरु झाले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/bcci-la-119-kotinch-danka-dream11-sponsorshipamadhun-maghar-aasiya-kapchaya-tondawar-motha-fatka/