अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात

अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात

अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,

पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्वत्र चिखलच चिखल असल्यामुळे तेथील नागरिकांना चिखलातून

वाट काढत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावे लागत आहेत. त्यांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने तेथील ग्रामस्थांना नरक यातना भोगत आहेत.

Related News

असे वृत्त प्रकाशित केले होते.

दैनिक अजिंक भारत वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत प्रशासन खळबळुन जागे झाले.

चिखलमय असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली. व रस्त्यावरील पथदिवे सुद्धा लावण्यात आले.

आडगाव खुर्द गट – ग्रामपंचायतने चिखलातील रस्त्यावर मुरूम टाकल्याने, चिखलातून मार्ग शोधण्याची ग्रामस्थांची कीटपीट बंद झाली आहे.

कातखेडा, पिंपळखुटा गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कातखेड,पिंपळखुटा गावामध्ये दलित वस्तीतील 25 ते 30 लक्ष रुपयांचे विकास कामे प्रस्तावित आहेत.

ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या विकास निधी मधून रस्त्यांचे कामे करावे, व ग्रामस्थांना होणारी अडचण दूर करावी.

अशी मागणी कातखेड पिंपळखुडा ग्रामस्थांच्या वतीने जोर धरू लागली आहे.

आम्ही गेल्या अनेक वर्षापासून रस्ते व लाईट संदर्भात ग्रामपंचायतला अनेक तक्रारी केल्या.

मात्र ग्रामपंचायतने कुठल्याच प्रकारची विकास कामे आमच्या कातखेड,पिंपळखुटा गावामध्ये केले नाहीत.

दरवर्षी पावसाळा लागला की आम्हाला चिखलातून मार्ग शोधत बाहेर पडावे लागते.

एवढी बिकट परिस्थिती आम्हा ग्रामस्थांची होती. मात्र 10 जुलै रोजी दैनिक अजिंक्य भारतने आमच्या गावाविषयी बातमी

लावल्याने लगेच ग्रामपंचायत च्या वतीने मुरूम टाकण्यास सुरुवात केली. व आमची तात्पुरती व्यवस्था केली.

आमच्या गावातील पक्के रस्ते व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे.

आम्ही सर्व ग्रामस्थ दैनिक अजिंक्य भारतचे शतशः आभार मानतो.

प्रदीप वानखडे,ग्रामस्थ कातखेड, पिंपळखुटा कातखेड, पिंपळखुटा या गावांमध्ये रस्त्यावर असलेल्या चिखलावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे.

सर्वत्र रोडवर मुरूम टाकून नागरिकांना येण्या – जाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आणि या रोडवरील पथदिवे सुद्धा लावण्यात आले आहेत.

या गावांमध्ये दलित वस्तीतील 25 ते 30 लक्ष रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.

ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झाल्यावर गावात पक्के रस्ते बांधण्यात येतील.

चरणसिंग डाबेराव,सचिव, गट- ग्रामपंचायत आडगाव खुर्द

Read Also :  https://ajinkyabharat.com/shelubbazar-arogya-kendra-kshiyugan-tapasani-shibir-digital-x-radwar-ae-skepticism/

 

Related News