मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांच्या पुढाकारणे ब्रिजवर रोषणाई
अकोला नाका जवळील रेल्वे पूल सुरु झाल्यापासून वादग्रस्तपूल
अशी या ब्रिजची ओळख आहे. कित्येक अपघात ब्रिजवर झालेले आहेत.
अनेक लोकांना जिव गमावा लागला.
अनेक किरकोळ व भीषण अपघात या ब्रिजवर झालेले आहेत.
ब्रिजवर सायंकाळच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा हा पुल ठरत आहे.
ब्रिजवर पथदिवे लावण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी शहराचे वतीने, 6 नोव्हेंबर 2024 रोजी,विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांना आमरण उपोषण करावे लागले.
यावेळी अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे यांनी पथदिवे लावण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले होते.
ब्रिजवर ट्रक व दुचाकी अपघातामध्ये कु. नम्रता वय 11 वर्ष या मुलीला जिव गमावावा लागला.
सायंकाळच्या सुमारास ब्रिजवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
आणि रहदारी सुद्धा भरपूर असतें. ब्रिजवर अंधार असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
ब्रिजवर होणारे अपघात टाळण्यासाठी अखेर अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक
डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी पुढाकार घेऊन आज 2 फेब्रुवारी रोजी नगरपरिषद कार्यालय मध्ये नॅशनल
हायवेचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या झालेल्या
नगरपरिषदेतील बैठकीमध्ये अकोला नाका पुलावरील ब्रिजवर पथदिवे व किरकोळ दुरुस्ती करणे संदर्भात चर्चा झाली.
आणि लवकरच ब्रिजवर पथदिवे लावन्यात येतील.
ब्रिजवरील अंधाराचे साम्राज्य संपवून त्या ठिकाणी रोषणाई व दिव्यांचा झगमगाट पाहवयास मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल घेत, प्रशासनाच्या वतीने ब्रिजवर लाईट लावण्याची कारवाई लवकरात – लवकर करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
Read here more news : https://ajinkyabharat.com/akola-polisanasathi-open-discussion-minister-of-state-for-home-pankaj-bhoir-yancha-participation/