उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार
यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात
त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हा व्हिडीओ
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यामुळे आता राजकीय
वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जाहीर सभेत बोलताना
आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, पोरगी जर पाहिजे असेल तर
पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती
तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्यांना भेटते.
दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा,
किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते
आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना
भेटते, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही, असं विधान
भुयार यांनी केले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरुन
आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. एका
बाजूला महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण
योजना सुरू केली आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या विधानामुळे
आता टीका सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी
यावरुन टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, भुयार यांचे हे वक्तव्य
कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी
करणारा प्रकार आहे. लोकांची अवहेलना करणे आहे. अजित पवार
गटाचे किंवा शिंदे गटाचे लोक असतील यांना एक खात्री पटली
आहे की आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार
नाही, या मस्तवालपणापासून अशी वाक्य येतात. शेतकरी आणि
महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा
सवालही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/shivneri-sundari-comes-to-serve-passengers-on-mumbai-pune-route/