अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम’; प्रतिभा शिंदे हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत

अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम

राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जोरदार पुनरागमनानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आज जळगावमध्ये झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.

 काँग्रेसला पुन्हा धक्का

प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

अखेर आज अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशा पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

 अजित पवार काय म्हणाले?

सत्तेवर असलो तरच निर्णय घेता येतात, धोरणं ठरवता येतात. सत्ता नसताना अडचणी किती येतात, हे गेल्या 35-40 वर्षांत आम्ही अनुभवलं आहे.

प्रतिभा शिंदे ताई, तुम्हाला राष्ट्रवादीत आल्यानंतर कधीही चूक वाटणार नाही. आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतील,

असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

 राष्ट्रवादीची ताकद वाढली

या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली असून आगामी स्थानिक निवडणुकांत याचा मोठा परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/shelu-khadseeel-shetkari-aggressive/