अजित पवार गटाच्या नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

विधानसभा

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार

Related News

गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या

भेटीगाठी घेत आहेत. नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी

शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे

वरिष्ठ नेते नरहरी झिरवळ त्यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा

मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

अशातच गोकुळ झिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात

चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर नरहरी झिरवळ यांनी मध्यमांशी

संवाद साधलात तेव्हा गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर

नरहरी झिरवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांच्या

भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होतं. जयंत पाटील माझे नेते आहेत.

त्यांचा जाऊन सत्कार कर आशा सूचना दिल्या होत्या, असं नरहरी झिरवळ

म्हणालेत. गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ झिरवळ हे शरद पवार

गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यावर झिरवळांनी प्रतिक्रिया

दिली आहे. तिथे त्याला विचारलं बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत.

म्हणून त्याने निवडणूक लढविण्याचं सांगितलं. त्यामुळे संभ्रम तयार झाला.

पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे,

असंही झिरवळ म्हणालेत.

Read also: https://ajinkyabharat.com/lalbaugcha-raja-charani-lean-along-with-chief-minister-shinde-family/

Related News