अजित पवार गट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर
गोळीबार करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.
या गोळीबाराच्या घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर
येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर
करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली.
यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी
यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या
राष्ट्रवादीचे बाबा सिद्धिकी हे ज्येष्ठ नेते आहे. बाबा सिद्धिकी यांनी
नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत
प्रवेश केला होता. १२ फेब्रुवारी २०२४ ला बाबा सिद्धिकी यांनी
अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्धिकी हे १९९९,
२००४ आणि २००९ साली सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून
आले होते. तर बाबा सिद्धिकी यांनी राज्यमंत्री पदाची देखील धुरा
सांभाळली होती.