अजय मुंडे आत्महत्या प्रकरण : तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पैशासाठी धमक्या, मारहाण व मानसिक छळ; शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त
कारंजा – तालुक्यातील रहिवासी व शांतीनगर येथे वास्तव्यास असलेले अजय वसंतराव मुंडे (वय 45 ) यांनी 18 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमागे झालेली पैशाची मागणी, वारंवार झालेला छळ, मारहाण आणि जीव घेण्याच्या धमक्या कारणीभूत असल्याचे
फिर्यादी संजय वसंतराव मुंदे यांनी कारंजा शहर पोलिसात तक्रारीत नमूद केले आहे.
10 ऑगस्ट रोजी अजय मुंडे यांना अज्ञात इसमांनी स्विफ्ट डिझायर (एमएच-एफई 0288 ) कारसह उचलून नेऊन मानव येथील
पेट्रोल पंपावर दिवसभर कोंडून ठेवले व बेदम मारहाण केली. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सकाळी सावरकर चौक, रेणुका वाईन बार जवळ पुन्हा त्यांच्यावर हल्ला करून पन्नास हजार
रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींपैकी एक स्वतःला मानोरा पोलीस ठाण्यातील पीएसआय असल्याचे सांगत होता.
या घटनेनंतर अजय मुंडे यांनी कारंजा शहर पोलिस ठाण्यात मोहन उत्तमराव ठाकरे (वय 47 ) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
मात्र, आरोपी संजय लीलाधर कापशीकर (वय 50 ) व सचिन काटोले (वय 50 ) हे देखील सतत फोन करून पैशाची मागणी व जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.
या छळामुळे अजय मुंडे मानसिक तणावाखाली होते.
14 ऑगस्टपासून ते घरून बेपत्ता झाले होते. 17 ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट रोजी दुपारी
साडेतीनच्या सुमारास घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 531/2025 नोंदवण्यात आला असून कलम 115 (2), 108 (3C), 140 (3) नुसार आरोपी मोहन ठाकरे,
संजय कापशीकर व सचिन काटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.
अजय मुंडे यांच्या मृत्यूमुळे शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/remove-zaheer-scorecard-29-augustpassoon-download/