डोनाल्ड ट्रंप आहेत माझे वडील ?
नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत असा दावा केला आहे की तिचे खरे वडील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आहेत.राखी सावंत म्हणाली, “माझी आई आता या जगात नाही. तिच्या मृत्यूपूर्वी तिने मला एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते की, राखी, तुझे खरे पापा डोनाल्ड ट्रंप आहेत.” हे ऐकताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.राखी सावंत याआधीही आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. कधी बॉलिवूडमधील कलाकारांवर वक्तव्य करून, तर कधी राजकारणावर भाष्य करून तिने नेहमीच वाद निर्माण केला आहे. मात्र यावेळी तिने थेट जगप्रसिद्ध नेत्याचे नाव घेतले असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे.सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी याला केवळ प्रसिद्धीसाठी केलेले पाऊल असे संबोधले आहे. तर काही जण तिने सांगितलेल्या गोष्टीत खरेपणा आहे का याबाबत शंका व्यक्त करत आहेत.राखी सावंतचा हा नवा खुलासा खरा आहे की फक्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. पण एवढे नक्की की तिच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत आली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/obc-muslim-muslim-khatik-samaj-sangatneche-organizing/