AI चा धोकादायक वापर! विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून ७८ लाखांची सायबर फसवणूक

AI चा धोकादायक वापर! विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून ७८ लाखांची सायबर फसवणूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत निवृत्त अधिकाऱ्याची

७८.६० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फसवेखोरांनी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा AI

द्वारे बनवून व्हिडीओ कॉल केला आणि अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खात्यातील संशयास्पद व्यवहार व NIA चौकशीचा बनाव रचला.

डिजिटल अरेस्ट, धमकी, आणि बनावट आरोपांच्या आधारे पीडिताकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळण्यात आले.

यानंतर फसवणूक लक्षात येताच पीडित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली.

क्रांती चौक पोलिसांकडून सायबर गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ही घटना AI फसवणुकीबाबत सायबर सुरक्षा यंत्रणांना मोठा इशारा ठरतेय.

Read Also : https://ajinkyabharat.com/