काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न

काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न

अजिंक्य भारत प्रतिनिधी, जानोरी: मेळ, देवराव परघरमोर, काझीखेड, आणि स्वरूपखेड

येथे हरभरा पिकाची शेतीशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला,

श्री. शंकर किरवे, आणि तालुका कृषी अधिकारी बाळापूर, श्री. सागर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काझीखेड

आणि स्वरूपखेड या गावांमध्ये शेतीशाळेचा चौथा वर्ग पार पडला.

या शेतीशाळेत शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे निरीक्षण करून चर्चा केली.

कृषी सहाय्यक श्री. उद्धव धुमाळे यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील रोग आणि किडींचे

व्यवस्थापन, कीटकनाशकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, तसेच जीवामृत, अमृतजल, आणि निंबोळी अर्क

बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

श्री. धुमाळे यांनी शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे नियमित निरीक्षण करण्याचे आणि किडींचे नुकसान पातळी

ओलांडल्यानंतरच फवारणी करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल.

या शेतीशाळेत कृषी मित्र अभिमन्यू धुमाळे, खारपान प्रोड्यूसर कंपनीचे संचालक श्री. एकनाथ धुमाळे, श्री. रवींद्र भांगे, श्री. गणेश खंडेराव

, तसेच काझीखेड आणि स्वरूपखेड येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.

श्री. धुमाळे यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे जानोरी, मोखा, आणि वझेगाव येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विशेष प्रशंसा व्यक्त केली जात आहे.