देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही
मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
म्हणून त्यांचा निर्णय होता; मात्र आता त्यांना मत द्यायची की
नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र
फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता
देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत
बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज
माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या
मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
बेचिराख करण्याचं काम केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
उद्ध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या
मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं
करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र
फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार
आपल्याला आरक्षण देईल, अशी अपेक्षा मराठा समाजातील
गोरगरीब जनतेला होती; मात्र आता ती अपेक्षा फोल ठरली, अशी
प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. सामाजिक चळवळीत काम
करीत असताना वैचारिक मतभेद असतात; पण मराठ्यांच्या
पोरांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठा समाजाचे पोरं मोठे
झाले, तर आपलं काय होईल, मराठ्यांची पोरं आरक्षणापासून
तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे, हे पोरं
भिकारी झाले पाहिजे, हे वचन देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं.
त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे
रचली. त्यांची चाल आता यशस्वी झाली, अशी टीकाही मनोज
जरांगे यांनी केली. आतापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या
हातात होतं. सत्ता त्यांच्या हातात होती. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या
आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी
मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठ्यांना
आरक्षण दिलं नाही.
Read also:https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-today/