अथक संघर्षानंतर नागपूरच्या वैष्णवीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत घेतली झेप

अकोला : डोक्यावरील पित्याचे छत्र हरविले. घरची परिस्थिती जेमतेम. अशाही परिस्थितीत तिने आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही.  कारण तिच्या पाठीशी आई होती. खाजगी दवाखान्यात दिवस रात्र काम करून तिच्या आईने मुलीच्या पंखांना उडण्याचे बळ दिले. आज या मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत धडक दिली आहे.
ही कर्तुत्ववान युवती कोण?
सामान्य परिस्थितीतून असामान्य पदापर्यंत पोहोचणारी कर्तुत्वान युवती नागपूर (nagpur) ची वैष्णवी बावस्कर आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत वैष्णवी ने आईने केलेल्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये कु.वैष्णवी हरिभाऊ बावस्कर (bavaskar) यांनी मुलीमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. याअगोदर वैष्णवीची मंत्रालयातील गृह विभाग कक्ष सहायक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. आता त्यांनी MPSC परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने बाजी मारली आहे. आता त्यांचे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिला संदेश
कुमारी वैष्णवी हरिभाऊ बावस्कर यांनी विदर्भातील विद्यार्थिनी समोर नवा आदर्श उभा केला आहे. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी जिद्द व चिकाटी असली तर काहीच अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. येत्या काळात शासकीय सेवेत काम करताना सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे घ्यावे लागू नये तसेच शेतकऱ्यांची कामे तात्परतेने करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससीच्या UPSC परीक्षेत लवकर यश मिळत नाही. त्यामुळे ते आपला मार्ग सोडून खाजगी नोकरीच्या मागे लागतात, किंवा दुसरा काही मार्ग शोधतात. परंतु आपण ठरवलेले लक्ष कायम ठेवा, आपले मन विचलित होऊ देऊ नका. वहा देर है अंधेर नही… अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वैष्णवी वर शुभेच्छांचा वर्षाव
वैष्णवी बावस्कर राज्यसेवा परीक्षेत मुलींमधून प्रथम आल्याचे वृत्त नागपूर मध्ये वाऱ्यासारखे पसरले. ही बातमी समजताच नातेवाईक मित्रमंडळी चे फोन येणे सुरू झाले. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा (shubhechha) दिल्या. सध्या त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.