दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून
पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Related News
आफ्रिकन संघाने प्रथमच टी- २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पडक मारली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ
अवघ्या ५६ धावांत सर्वबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत
अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही.
यानंतर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत अवघ्या ८.५ षटकांत विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २९ धावा केल्या.
तर कर्णधार एडन मारक्रमने २३ धावा केल्या.
हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले. आफ्रिकन संघाने अवघ्या
८.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला.
संघाची सुरुवात तशी खराब झाली पण धावसंख्या कमी असल्याने
दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला.
किंटन डी कॉक अवघ्या ५ धावा करून क्लीन बोल्ड झाला.
त्याला फजलहक फारुकीने बाद केले.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने या सामन्यात नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात अफगाणिस्तानचे फलंदाज कमालीचे फ्लॉप ठरले
आणि कोणत्याही खेळाडूला संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही,
फक्त अजमतुल्ला उमरझाईला दुहेरी आकडा गाठता आला.
या सामन्यात त्याने १० धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज, नूर अहमद आणि मोहम्मद नबी
यांना खातेही उघडता आले नाही.
माकों यान्सनने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला धक्का देत गुरबाजला बाद केले.
तर यान्सनने त्याच्या स्पेलमधील पुढच्या पटकात गुलबदीनला माघारी धाडले.
पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले.
त्याने पहिल्या चेंडूवर इब्राहिम झादरानला क्लीन बोल्ड केले.
चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीलाही बोल्ड केले.
माकों यानसेनने खरोटोला माघारी धाडलं.
तर एनरिक नॉर्खियानेही आपल्या पहिल्याच षटकात यश मिळवले.
तबरेझ शम्सीनेही पहिल्याच पटकात दोन विकेट घेतले.
त्याने करीम जनात आणि नूर अहमद यांना पायचीत केले.
नॉर्खियाने रशीद खानला बोल्ड केले. नवीन उल हक शम्सीचा बळी ठरला
अन् अफगाणिस्तान ५६ धावांवर ऑल आऊट झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.
माकों यान्सने ३ षटकांत १६ धावा देत ३ विकेट घेतले.
तबरेज शम्सीनेही तीन विकेट्स घेतल्या.
कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खियाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
या गोलंदाजांमुळेच अफगाण संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही
आणि सर्व फलंदाज झटपट माघारी परतले.
आज संध्याकाळी भारत आणि इंग्लंड दुसऱ्या उपांत्य फेरीत भिडणार आहेत.
या सामन्यातील विजयी संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामना खेळेल.
हा अंतिम सामना २९ जूनला बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/israels-deadly-bombshell/