अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय

रवी राणां

आमदार रवी राणांची टीका

अमरावती मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी दिवसागणिक

आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात

Related News

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ

त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू

यांनी देखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.

त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना

हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता

पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका

कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला.

पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं,

त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही,

हे सांगणारे अडसूळ कोण? त्या बाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे.

उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता.

मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. असे ते म्हणाले होते.

मुळात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं

सिटी को-ऑपरेटिव बँकमध्ये अजून पर्यंत त्यांच्यावर आरोप पत्र दाखल झालं नाही.

त्यांनी त्या ठिकाणी मोठा घोटाळा केलाय.

त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून

पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी पलटवार करत निशाणा साधला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/mouni-roy-shares-special-photo-with-her-husband/

Related News