“अमरावतीतील मध्यवर्ती बसस्थानक आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. बसस्थानक इमारतीचे छप्पर, भिंती आणि पाण्याच्या टाक्या पूर्णपणे जर्जर झाल्या आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पासेस शाखेच्या छताचा व भिंतीचा मोठा भाग कोसळला, तर स्लॅबमधील सळई पूर्णपणे गंजल्याचे दिसून आले. पाण्याच्या टाकीचा भागही खराब झाल्याने सतत पाणी गळत असून, परिसरात सांडपाण्याचा त्रास वाढला आहे.याशिवाय, चौकशी कक्षाजवळ पाणी साचत असल्याने प्रवासी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर परिसरात घुशी व उंदीर वाढल्यामुळे तळभागही भुसभुशीत झाला आहे.या गंभीर परिस्थितीत विभागीय अभियंता यांनी तातडीने पाहणी करून, बसस्थानकाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी प्रशासनाने केली आहे.”
read also : https://ajinkyabharat.com/adjavat-vizpurvathyacha-serious-question/
