प्रशासनाचा नागरिकांना मोठा आवाहन

प्रशासनाचे “घराबाहेर न पडण्याचे” कठोर आवाहन

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे आणि रायगड भागात पुढील तीन तास अतिमुसळधार पावसाची भीषण शक्यता आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काल रात्रीपासूनच राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, आज सकाळी पावसाचा वेग आणखी वाढला आहे. मुंबईत मध्य, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत.

मध्य रेल्वे: १५ ते २० मिनिटे उशीर

वेस्टर्न रेल्वे (विरार ते चर्चगेट): ५-७ मिनिटे उशीर

हार्बर लाईन (नेरूळ ते सीएसएमटी): ६-७ मिनिटे उशीर

 किंग सर्कल आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
बार्शी तालुक्यातील चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांना मोठा फटका बसला आहे.

 वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रति तास राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.
यामुळे मुंबई आणि उपनगरांसह विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचे अत्यंत संतप्त स्वरूप अनुभवायला मिळत आहे.

 प्रशासनाचे आवाहन:

अतिमहत्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडू नका.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा विचार करा.

सतत स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या अपडेट्सची चौकशी करत राहा.

read also :https://ajinkyabharat.com/gavakyanchaya-long-term-magnation/