व्यसन व मानसिक आजाराचा फटका

पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केली

वाशीम हादरलं! दवाखान्यात नेण्याच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली,

वाशीम जिल्ह्यातील कोठारी गावात आज एका धक्कादायक दुहेरी आत्महत्या प्रकरणाने परिसर हादरला आहे. व्यसनाधीनता आणि मानसिक आजाराने त्रस्त हिम्मत धोंगडे (वय सुमारे 40) यांनी आपल्या पत्नी कल्पना धोंगडे (वय सुमारे 35) यांच्यावर धारदार वीळ्या-कुऱ्हाडीने वार करून खून केला. पत्नीचा आग्रह होता की, त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले जावे, मात्र मामुली वादातून संतापलेल्या हिम्मतने ही हानिकारक घटना घडवली.यानंतर हिम्मतने घर बंद करून आतून गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगरूळपीर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. प्राथमिक तपासात व्यसनाधीनता आणि मानसिक आजाराचा फटका कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दुहेरी घटनेने कोठारी गावात हळहळ पसरली असून, सामाजिक स्तरावर व्यसनाधीनता व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याविरोधात चर्चा सुरू झाली आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/turiforon-tanav-vadhla/