दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका! -ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी

औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत

Related News

गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास

करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर

यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न

घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी

नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली हा

दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस

असल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र

प्रवर्तन दिनानिमित्त 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान

दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि

महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन

दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि

देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत

असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की,

आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द

अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा, असे या

पत्रात म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ratan-tata-became-his-heir/

Related News