अभिनेत्री हुमा कुरैशीच्या चुलत भावाचा खून

अभिनेत्री हुमा कुरैशीच्या चुलत भावाचा खून

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांच्या चुलत भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात पार्किंग वादातून ही हत्या करण्यात आली.

निजामुद्दीन येथील जंगपूरा भोगल बाजार गल्लीमध्ये गुरुवारी उशिरा रात्री

स्कूटी गेटजवळून बाजूला लावण्यावरून वाद झाला.

या वादात आरोपींनी आसिफ कुरेशी यांच्यावर हल्ला केला.

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले,

मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतकाच्या पत्नी व नातेवाईकांनी सांगितले की, किरकोळ कारणावरून आरोपींनी निर्दयीपणे हत्या केली.

मृतकाच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, याआधीही पार्किंगवरून पतीचा त्यांच्याशी वाद झाला होता.

कामावरून घरी परतल्यावर आसिफ यांनी घरासमोर उभी असलेली शेजाऱ्यांची स्कूटी हटवण्यास सांगितली.

मात्र स्कूटी काढण्याऐवजी शेजाऱ्यांनी त्यांच्यासोबत शिवीगाळ केली आणि धारदार शस्त्राने त्यांचा खून केला.

पार्किंग वादातून झालेल्या या हल्ल्यात आसिफचा मृत्यू झाला असून,

पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/each-nagarkani-tree-safety/