अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर केली

‘लाखात एक आमचा दादा’ संपण्याच्या मार्गावर?

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ संपण्याच्या मार्गावर? अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर केली

मुंबई – झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेनंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. ही मालिका म्हणजे ‘लाखात एक आमचा दादा’. या मालिकेत नितीश चव्हाण आणि मृण्मयी गोंधळेकर मुख्य भूमिकेत आहेत. सूर्या दादा आणि तुळजा या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली आहे, मात्र आता या लोकप्रिय जोडीतून प्रेक्षकांना निरोप घ्यावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या मालिकेत सूर्या दादाची बहिण राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने नुकतीच एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. व्हिडिओमध्ये ती मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये मेकअप करताना दिसत आहे.

कॅप्शनमध्ये ईशा म्हणते – “राजश्री म्हणून शेवटचं एकदा तयार होताना… मन खूप भरुन आलंय, फक्त खूप साऱ्या आठवणी मनात घोंगावत आहेत, डोळ्यात पाणी अन् हात थंड पडलेत… 1 वर्ष आणि 5 महिने… राजू या भूमिकेतून निरोप घेते.”

ईशाच्या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आणि कलाविश्वातील मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. मात्र, या पोस्टवरून स्पष्ट झालेले नाही की फक्त ईशा मालिकेचा भाग सोडत आहे की संपूर्ण मालिकाच बंद होणार आहे. वाहिनीकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेला एकही नॉमिनेशन मिळालेले नाही. यावरूनही काही तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते.

वाहिनीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच मालिकेच्या भविष्यासंबंधी स्पष्टता मिळेल.

read also : https://ajinkyabharat.com/kolkatyatil-don-bankanchi-kotyavadhi-fasavanuk/