अकोल्यात भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत एक गंभीर जखमी

अकोल्यात भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत एक गंभीर जखमी

अकोला – राष्ट्रीय महामार्गावरील कृषी विद्यापीठाजवळ भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अमोल तवाळे असे जखमीचे नाव असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानशिवनी येथून अकोला धान्य मार्केटकडे जाणारे टाटा एस वाहन टायर

Related News

पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभे होते. टायर दुरुस्त करत असताना अमरावतीहून अकोलाकडे भरधाव येणाऱ्या

आयशर ट्रकने उभ्या वाहनाला जबर धडक दिली. अपघातामुळे टाटा एस वाहनाचे मोठे नुकसान झाले असून,

अमोल तवाळे गंभीर जखमी झाले.

विशेष म्हणजे हा अपघात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असतानाही,

तब्बल एक तास उलटल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-rural-polisanchi-illegal-cow-dynasty/

Related News