आशिया कप टीममध्ये स्थान नाही; शमीचं मोठं वक्तव्य – “कोणालाही दोष नाही, संधी मिळाली तर बेस्ट देईन”

आशिया कपबाहेर शमी; दुलीप ट्रॉफीत करणार पुनरागमन

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून,

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला या संघात स्थान मिळालेलं नाही.

निवड न झाल्यावर शमीने आपलं मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

न्यूज24 शी बोलताना शमी म्हणाला, “माझं सिलेक्शन झालं नाही म्हणून मी कोणालाही दोष देणार नाही.

माझी कुठलीही तक्रार नाही. टीमसाठी योग्य ठरेन, तर मला घ्या;

नाही तर मला काही अडचण नाही. सिलेक्टर्सचं काम म्हणजे टीमसाठी योग्य निर्णय घेणं.

माझा माझ्या क्षमतांवर विश्वास आहे. संधी मिळाली तर मी बेस्ट देईन.”

शमी सध्या पूर्णपणे फिट असून, तो लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.

“जर मी पाच दिवसीय क्रिकेट खेळतोय, तर T20ही खेळू शकतो. मी कठोर मेहनत करतोय.

ब्रोंको टेस्टही मी पास केली आहे. आता मी खेळण्यासाठी तयार आहे” असे शमीने स्पष्ट केले.

शमीचा टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत झाला होता.

त्यानंतर आयपीएल खेळल्यानंतर तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिला होता.

भारतासाठी आशिया कपमध्ये शमीचा अनुभव महत्त्वाचा ठरू शकला असता,

मात्र त्याला वगळण्यात आलं आहे.

तरीही शमीने दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्याची पुनरागमनाची तयारी स्पष्ट दिसत आहे.

read also:https://ajinkyabharat.com/shivneriwarun-manoj-zarangren-moth-vidhan/