आप कार्यकर्त्यांकडून तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा

आम आदमी

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

यांचा आज वाढदिवस आहे. तिहार तुरुंगात बंद असलेले

अरविंद केजरीवाल आज 56 वर्षांचे झाले आहेत.

Related News

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगाबाहेर

अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी त्यांनी केक कापत अरविंद केजरीवाल यांच्या फोटोला केक भरवला.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना

देशभक्त आणि क्रांतिकारी नेता म्हटले आहे.

X वर एका पोस्टमध्ये सिसोदिया यांनी लिहिले की, सिसोदिया यांनी लिहिले-

देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीविरुद्ध सर्वात कठीण लढाई लढणाऱ्या

माझ्या प्रिय मित्राला आणि राजकीय गुरूला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सिसोदिया यांनी स्वत:चे केजरीवालांचे सैनिक असल्याचे सांगून

हुकूमशहासमोर गुडघे टेकण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत केले.

आज देशाची लोकशाही अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने कैद झाली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-symbol-received/

Related News