खेर्डा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर संपन्न
जळगाव जामोद : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन आज (१९ सप्टेंबर) जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, खेर्डा येथे करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना व दाखल्यांचा लाभ देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार व माजी कॅबिनेट मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार पवन पाटील, गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेर्डा बु. सरपंच मकरणाबाई पिंपळकर, खेर्डा खुर्द सरपंच फुलंवंता बाई चव्हाण आणि निंभोरा सरपंच रेखाताई चव्हाण उपस्थित होते.
आवाहन आणि मार्गदर्शन
प्रास्ताविकात तहसीलदार पवन पाटील यांनी सर्व ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा उद्देशही त्यांनी स्पष्ट केला. आमदार डॉ. संजय कुटे यांनी आत्मनिर्भर भारत, स्वदेशी वापर या संकल्पनांवर भाष्य करत महिलांसाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणीबाबत माहिती दिली.
सत्कार व दाखले वितरण
शिबिरादरम्यान माजी सैनिक चंद्रकांत देशमुख, गजानन मानकर, सुनील झांगोजी, दामोदर आशिष, वासुदेव वानखडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध दाखले ग्रामस्थांना वितरित करण्यात आले.
ग्रामस्थ व अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र उमाळे, प्रवीण भोपळे, रंगराव देशमुख, दिलीप राठी, समाधान खिरोडकर, श्याम बापू देशमुख, वसंतराव जाधव, ज्ञानदेवराव राजनकर, प्रदीप मोरखडे, कैलासराव दामोदर, अमोल राव देशमुख, परमेश्वर वानखडे, विविध गावांचे पोलीस पाटील, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, शाळा कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी गौतम वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी व्ही. एस. शिंदे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/chief-minister-youth-work-training-yojneti-training/