आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,

आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.

कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,

Related News

“तक्रार नसलं तरी पोलीस चौकशी करू शकतात.”

दरम्यान, गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना “कारवाईला घाबरत नाही,

लवकरच फडणवीसांना भेटणार” असं म्हटलं आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “बनियान-टॉवेल गँगचे नेतृत्व गायकवाड करतात,”

अशी टीका करत चौकशीची मागणी केली आहे. त्यावर गायकवाडांनी पलटवार करत,

“हे माझं साधं राहणीमान आहे, राऊतांनी अक्कलेचे तारे तोडले”, असं म्हणत वाद आणखी पेटवला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pimpri-chinchwadche-naming-rajmata-jijounagar/

Related News